Ad will apear here
Next
शिवसेना नेते प्रदीप कर्पे यांचा भाजप प्रवेश
धुळे : महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रदीप कर्पे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबईत नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयातील पक्षप्रवेशाच्या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपचे धुळे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल व नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब सानप उपस्थित होते.

प्रदीप कर्पे यांच्यासमवेत बबन चौधरी, ॲड. चंद्रकांत चौधरी, माजी सरपंच नंदुभाऊ पाटील, नरेश हिरे, सुधार समाज संघटनेचे अध्यक्ष पराग अहिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी धुळ्यातील महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खासदार पाटील दानवे म्हणाले, ‘भाजपचे केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात विकास कार्य करीत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनतेची कामे करावीत. आपल्या सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. कार्यकर्त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क साधून आपल्या सरकारच्या योजनांचा लोकांना लाभ करून दिला पाहिजे.’

संरक्षण राज्यमंत्री व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा संदेश जयकुमार रावल यांनी वाचून दाखविला. या वेळी भाजपचे धुळ्यातील कार्यकर्ते मदनभाऊ डापसे, हिरामन गवळी, चंद्रकांत गुजराथी, ओम खंडेलवाल, भिकन वराडे, अमित थोरात, युवराज पाटील, बापू खांडवे, सोमाण शिंदे, अमोल धामणे, रमेश शिंदे, संजय बडगुजर, डॉ. विपुल बाफना, डॉ. आर. आर. पाटील, डॉ. संजय बोरसे, राजा बडगुजर, कुणाल चौधरी, शिवलाल चौधरी, विलास शिंपी, प्रकाश पाटील, राजू महाजन, छोटू थोरात, संजय वराडे उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZMZBG
Similar Posts
‘कटुता विसरून ‘भाजप-सेने’ला विजयी करण्याचा निर्धार’ औरंगाबाद : भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेनेदरम्यान गेल्या साडेचार वर्षांत जे झाले ते सर्व विसरून एकदिलाने राज्यात लोकसभा निवडणुकीत युतीच्या ४५ जागा निवडून आणण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी १७ मार्च २०१९ रोजी औरंगाबाद येथे भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मानले धुळेकरांचे आभार मुंबई : ‘धुळ्यातील जनतेने जो ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विकासाच्या राजकारणावर दाखविला, तो सार्थकी लावू आणि एक स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन तेथील महापालिकेच्या माध्यमातून ‘भाजप’ देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सर्वांना समान न्यायाची रामनाथ कोविंद यांची हमी मुंबई : ‘भारताच्या संविधानाचे सर्वोच्च महत्त्व टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संविधानामध्ये तरतूद केल्याप्रमाणे जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपती झाल्यावर सर्वतोपरी प्रयत्न करीन,’ अशी ग्वाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी १५ जुलै रोजी मुंबईत दिली
‘युतीमुळे महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकू’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्ष (भाजप) व शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील,’ असा निर्णय १८ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘भाजप’ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत जाहीर केला. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language